सिल्लोड, (प्रतिनिधी) परभणी येथे झालेल्या ३९ व्या प्रांतीय शूटिंग बॉल निवड स्पर्धे त औरंगाबाद जिल्ह्याने दूसरे स्थान पटकावले सिल्लोड प्रतिनिधी-२९ आणि ३० नोव्हेंबर २०२५ रोजी परभणी येथे झालेल्या ३९ व्या प्रांतीय शूटिंग बॉल संघ निवड स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याने दुसरे स्थान पटकावले. या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील पोपट गाडेकर, सलमान शेख, जुनैद शेख, समीर झिया, कैसर शेख, मजहर शेख, भूषण पांडे यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली. या आधारावर शेख जुनैद, पोपट गाडेकर, शेख अब्दुल रफिक अब्दुल लतीफ यांची महाराष्ट्र संघात निवड झाली.
हे तिन्ही खेळाडू सिल्लोड तालुक्याचे आहेत. महाराष्ट्र शूटिंग बॉल असोसिएशन, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक सचिव अंकुश राठोड यांनी या तिन्ही खेळाडूंचे स्वागत केले. यासोबतच, माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार आणि युवा नेते अब्दुल समीर यांनी फोनवरून या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच नगरपालिकेचे माजी सदस्य शेख मोहसीन, मिर्झा चांद बेग, अशफाक पठाण आणि युवा क्लासिक टीम सिल्लोड यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.